नवी दिल्ली -लॉकडाऊन दरम्यान15 देशांसोबतचीआंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा आणि 'आंतरराष्ट्रीय ट्रॅक पॅकेट' सेवा भारतीय पोस्ट खात्याने पुन्हा सुरू केली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा सुरू - रविशंकरप्रसाद - international tracked packet service
आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टची सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करून दिली आहे.
डिलिव्हरी टाईमलाइन एव्हिएशन सेवेवर अवलंबून आहे. मात्र, इतर आंतरराष्ट्रीय पार्सल आणि पत्रांची बुकिंग सेवा स्थगित आहे. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून 31 मे पर्यंत त्याचा अंमल राहणार आहे. कोरोना संकटामुळे आतंरराष्ट्रीय आणि देशांतर्गतही अनेक सेवांवर परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टची सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करून दिली आहे. आंतरराष्ट्रीय ट्रॅक पॅकेट सेवा पूर्वीच्या मार्गांवरच सुरू राहिल असेही त्यांनी सांगितले.