नवी दिल्ली - २ ऑक्टोबर या दिवसाला भारताच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाप्रमाणे २ ऑक्टोबरही राष्ट्रीय स्तरावर विशेष दिन मानला जातो. या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान ही प्रसिद्ध घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींचा जन्म झाला होता. शास्त्रींची आज त्यांची ११५ वी जयंती आहे.
शास्त्रीच्या ११५ व्या जयंती निमित्ताने पंतप्रधान मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी विजयघाट येथे त्यांना श्रद्धांजली वाहिली. शास्त्रींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ ला उत्तरप्रदेशातील मुगलसराय येथे झाला. लाल बहादुर शास्त्रींनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. पंडित जवाहरलाल नेहरुनंतर ते देशाचे दुसरे पंतप्रधान बनले.