महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या २८२ भारतीयांची सुटका होणार?

भारतीय नागरिक, लष्करातील जवान आणि मच्छीमार जे त्यांच्या बोटीसह पाकिस्तानच्या कैदेत आहेत, त्यांना लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जोर देण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालय

By

Published : Jan 2, 2020, 10:35 AM IST

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांनी आपल्या ताब्यात असलेल्या कैद्यांची यादी एकमेकांना सादर केली आहे. भारताच्या कैदेत असलेल्या २६७ पाकिस्तानी नागरिक आणि ९९ मच्छिमारांची यादी भारताने पाकिस्तानला सादर केली आहे. पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या ५५ नागरिक आणि २२७ मच्छिमारांची पाकिस्तानने भारताला सादर केली आहे.

हेही वाचा -दिल्लीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'; ज्ञानेश्वर मुळेंनी म्हटली कविता

२००८ च्या करारानुसार प्रत्येक वर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी आप-आपल्या देशात कैदेत असलेल्या नागरिक, मच्छिमारांची यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार भारताकडून कैद्यांची यादी जाहीर करण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच, तर गंदेरबाल जिल्ह्यात दहशताद्यांच्या हस्तकाला अटक

भारतीय नागरिक, लष्करातील जवान आणि मच्छीमार जे त्यांच्या बोटीसह पाकिस्तानच्या कैदेत आहेत, त्यांना लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जोर देण्यात आला आहे. पाकिस्तानने दिलेल्या यादीतील ४ नागरिक आणि १२६ मच्छिमार भारतीय असल्याची तत्काळ खात्री करून पाकिस्तानला माहिती दिली आहे. तसेच आपल्या १४ नागरिक आणि १०० मच्छिमारांचा पाकिस्तानने कायदेशीर प्रक्रियेसाठी मदत मिळवून देण्याची मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details