नवी दिल्ली - भारत आणि नेपाळमध्ये आज सोमवारी उच्चस्तरीय ऑनलाइन बैठक होण्याची शक्यता आहे. ही बैठक नेपाळमध्ये प्रगतीपथावर असलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्पा संदर्भात चर्चा होणार आहे.
भारताचे नेपाळमधील राजदूत मोहन क्वात्रा हे नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. ही उच्चस्तरीय बैठक नेपाळने आपल्या वादग्रस्त नकाशाला मान्यता दिल्यानंतर प्रथमच होत आहे. नेपाळमध्ये प्रगतीपथावर असलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्पाबाबत चर्चा होणार आहे.