नवी दिल्ली -आपल्या देशाच्या विविध गरजा भागवण्यासाठी आणखी शंभर उपग्रहांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इस्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देशाचा आवाका लक्षात घेता संशोधन, संप्रेषण आणि दळण-वळण क्षेत्रात आणखी प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त उपग्रहांची गरज आहे. सध्या भारताकडे 55 उपग्रह आहेत. येणाऱ्या काळात आणखी 100 उपग्रहांची गरज देशाला आहे, असे ते म्हणाले.