महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात दरदिवशी अडीच लाखांपेक्षाही जास्त करोनाचे रुग्ण आढळतील, एमआयटीचा इशारा - भारत कोरोना बातमी

कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित देश कोणते असतील याचा आताच्या परिस्थितीवरून अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इराण, इंडोनेशिया, नायजेरीया, तुर्कस्थान, फ्रान्स आणि जर्मनी हे देश सर्वात जास्त प्रभावित असतील असा दावा संशोधकांनी केला आहे.

संगॅहित छायाचित्र
संगॅहित छायाचित्र

By

Published : Jul 8, 2020, 1:32 PM IST

नवी दिल्ली -भारतासह जगभरातील कोरोनाच्या परिस्थितीवरून अमेरिकेच्या मॅसाच्युसेट इन्सस्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी(एमआयटी) संशोधन केले आहे. या संशोधनातून कोरोना प्रसाराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनावर लस किंवा औषध अजूनही उपलब्ध नाही. अशा परिस्थिती 2021 सालच्या हिवाळ्यापर्यंत भारतात कोरोनाचे दर दिवशी 2 लाख 87 हजार रुग्ण सापडू शकतात, असा इशार एमआयटीने दिला आहे.

जर कोरोनावर कोणतीही लस किंवा औषध आले नाही तर जगभरामध्ये पुढील वर्षीच्या हिवाळ्यापर्यंत 24 कोटी 90 लाख कोरोनाचे रुग्ण असू शकतात, तर 18 लाख रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज एमआटीने केलेल्या अभ्यासातून वर्तवला आहे. एमआयटीच्या लोसन येथील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील टी. वाय लिम, जॉन स्टरमन आणि हाझिर रहमनदाद या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

या संशोधनात आम्ही जागतिक स्तरावर अनेक देशांमधील कोरोनाच्या प्रसाराचा अंदाज वर्तवला आहे, असे संशोधकांनी म्हटले. कोरोना प्रसाराचे विविध पैलू आणि गणितीय मॉडेल वापरून या अभ्यासाचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. 84 देशांतील सुमारे साडेचारशे कोटी नागरिकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

सर्वात जास्त प्रभावित देश कोणते असतील याचा आताच्या परिस्थितीवरून अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इराण, इंडोनेशिया, नायजेरीया, तुर्कस्थान, फ्रान्स आणि जर्मनी हे देश सर्वात जास्त प्रभावित असतील असा दावा संशोधकांनी केला आहे. सर्वात जास्त प्रभावित देश भारत असेल. त्यानंतर अमेरिकेत दिवसाला 95 हजार रुग्ण आढळून येतील. दक्षिण आफ्रिका 21 हजार रुग्ण, इराण 17 हजार, इंडोनेशियात 13 हजार रुग्ण पुढील हिवाळ्यापर्यंत दरदिवशी आढळतील असे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details