नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत संकेत दिले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून केंद्र सरकार राज्यांसोबत यासाठीची तयारी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरणाचा देशाला अनुभव..
गेल्या चार महिन्यांपासून केंद्र सरकार, राज्य सरकारसोबत मिळून अगदी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरही लसीकरण कशा प्रकारे करता येईल याची तयारी करत आहे. भारतात एवढ्या मोठ्या स्तरावर लसीकरण करणे शक्य आहे का असे विचाराल तर मी म्हणेल की नक्कीच आहे. २५ वर्षांपूर्वी जगातील ६० टक्के पोलिओग्रस्त मुले भारतात होती. त्यानंतर भारताने ज्याप्रकारे लसीकरण केले, ते पाहून त्याचे इतर आशियाई देशांनीही अनुकरण केले होते. दोन दशकांपर्यंत आपण लहान मुलांना ही लस दिली, ज्याचे परिणाम आपल्याला २०१४मध्ये दिसून आले जेव्हा भारताचा समावेश पोलिओमुक्त देशांमध्ये झाला. अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.