- सत्ता तर सोडाच राज्यातही कुणी तुम्हाला उभं करणार नाही; राज्यमंत्री बच्चू कडूंचा भाजपवर प्रहार
LIVE : महाराष्ट्रात आम्ही फक्त सूचना देऊ शकतो; स्वीकारायचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा - राहुल गांधी
15:39 May 26
15:39 May 26
- परभणीत सामूहिक नमाज पठाणाकडे दुर्लक्ष..! पोलीस अधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांच्याही बदल्या
15:36 May 26
- 25 मेपर्यंत 3 हजार 274 श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून 44 लाख मजूरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले - भारतीय रेल्वे
15:31 May 26
- महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूरांना त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी 125 रेल्वे ऑफर केल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र सरकारने 25 मे ला दुपारी 2 वाजेपर्यंत फक्त 41 रेल्वेची माहिती दिली आहे.
15:29 May 26
- सावध नियोजनानंतर छोट्याशा सूचनेवर रेल्वेने आपले साधने एकत्र केली आहेत आणि 145 श्रमिक रेल्वे तयार केल्या आहेत. त्या 26 मेला महाराष्ट्रातून सोडल्या जाणार आहेत. या रेल्वेंना आजपासून अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
15:20 May 26
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि तीन सेवा प्रमुखांसह सुरक्षा आढावा बैठक घेतली.
15:13 May 26
- उत्तराखंडमध्ये आज 51 कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या झाली 400 तर 4 जणांचा मृत्यू - उत्तराखंड आरोग्य विभाग
13:52 May 26
धारावी ,सायन कोळीवाडा ,लेबर कॅम्प येथील तामिळनाडू येथे जाणाऱ्या लोकांसाठी आज 2 ट्रेन सोडण्यात येणार आहेत - आमदार कॅप्टन तमिल सेलवन
13:49 May 26
- वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेले एकूण स्वॅब नमुने : १८३ (आज-१४)
- 8 जणांना कोरोनाची बाधा, 2 जणांना डिस्चार्ज एकाचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांवर उपचार सुरु आहेत.
- निगेटिव्ह अहवाल : १३७ (आज-०५)
- अहवाल अप्राप्त : ३८
12:25 May 26
- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण; जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 161 वर
12:18 May 26
महाराष्ट्र कोरोना अपडेट
- अकोल्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 13 रुग्ण सापडले पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
11:54 May 26
- गेल्या 24 तासात कोरोना ग्रस्त पोलिसांच्या संख्येत 80 ने भर तर 2 जणांचा मृत्यू, राज्यात आतापर्यंत 1889 पोलिसांना बाधा, तर 20 जणांचा मृत्यू
11:37 May 26
हैदराबाद- महाराष्ट्रातील कोरोनाचे निर्णय दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. याबाबत राहुल गांधी म्हणाले, आम्ही फक्त राज्य सरकारचा सूचना देऊ शकतो. मात्र, निर्णय घ्यायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय राज्यसरकारचा असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
भारत असा देश ज्याठिकाणी कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि आपण लॉकडाऊन काढत आहोत, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. लॉकडाऊन करण्याचा उद्देश अयशस्वी झाला आहे. या अयशस्वी झालेल्या लॉकडाऊनचे परिणामही दिसत असल्याची टीका गांधी यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने पश्चिमबंगामधील नागरिकांसाठी 41 श्रमिक विशेष रेल्वेची मागणी केली आहे. तर या रेल्वे आज सोडण्यात येऊ शकतात, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे अम्फान महाचक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सध्यातरी रेल्वे पाठवण्यावर विरोध दर्शवला आहे.