नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या सोबत कोरोनाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. भारत आणि जपानच्या संबंधांमुळे तसेच जागतिक भागीदारीमुळे कोरोना-नंतरच्या जगासाठी नवीन तंत्रज्ञान आणि उपाय विकसीत होण्यासाठी मदत होईल.
जपानचे पंतप्रधान आणि माझे मित्र शिंजो अॅबे यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. भारत आणि जपानमध्ये असलेले हे विशेष संबंध आणि जागतिक भागिदारी नक्कीच भविष्यासाठी उपयोगाची ठरणार आहे. यातूनच कोरोना-नंतरच्या जगासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि उपाय तयार होण्यास चालना मिळेल. याचा फायदा या दोन्ही देशातील नागरिकांना, इंडो-पॅसिफिक भागातील नागरिकांना, तसेच संपूर्ण जगाला होणार आहे. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.