महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...तर द्विपक्षीय संबंध बिघडतील, शेतकरी आंदोलनावरून भारताचा कॅनडाला इशारा - pm trudeau on farmer agitation

जर कॅनडा भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करत असेल द्विपक्षीय संबंधांना धोका पोहचेल, असेही भारताने स्पष्ट केले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार असून या अधिकारासाठी कॅनडा कायमच शेतकऱ्यांबरोबर उभा राहील, असे वक्तव्य ट्रूडो यांनी केले होते. त्यावर भारताने नाराजी व्यक्त केली होती.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 5, 2020, 7:04 AM IST

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला उत्तर दिले आहे. भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना याबाबत समन्स बजावले आहेत. पंतप्रधान ट्रूडो आणि कॅनडातील नेत्यांचे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबतचे वक्तव्य भारताच्या अंतर्गत मुद्द्यातील हस्तक्षेप असून हे कधीही स्वीकारले जाणार नाही, असे कॅनडाच्या आयुक्तांना बजावले.

..तर द्विपक्षीय संबंध बिघडतील

जर कॅनडा भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करत असेल द्विपक्षीय संबंधांना धोका पोहचेल, असेही भारताने स्पष्ट केले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार असून या अधिकारासाठी कॅनडा कायमच शेतकऱ्यांबरोबर उभा राहील, असे वक्तव्य ट्रूडो यांनी केले होते. त्यावर भारताने नाराजी व्यक्त केली होती.

दुतावासातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात

ट्रूडो यांच्या या वक्तव्यानंतर कॅनडातील भारतीय दुतावासाबाहेर नागरिकांनी गर्दी झाली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही भारताने कॅनडा उच्चायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कॅनडा सरकार भारतीय दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षा करेल, असा विश्वास भारताने व्यक्त केला. शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटला नसून ८ डिसेंबरला आंदोलकांनी भारत बंदची हाक दिली आहे. तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details