नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घसरलेल्या जीडीपीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. रोजगाराचे कमी झालेले प्रमाण, रोज कोरोनाच्या रुग्णांची होणारी सर्वोच्च संख्या आणि सीमेवर बाहेरुन घुसखोरी ही संकटे मोदींनी निर्माण केल्याचा राहुल गांधींनी दावा केला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देश सहा समस्यांना सामोरे जात असून या समस्या म्हणजे मोदी सरकारने तयार केलेले संकट असल्याचे गांधींनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मोदींनी निर्माण केलेल्या संकटात भारत धक्क्यात आहे. देशाच्या जीडीपीत २३.९ टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. तर बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक आहे. देशात १२ कोटी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. केंद्र सरकार राज्यांना थकित जीएसटी देत नाही. तर जगात सर्वाधिक देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूंची संख्या देशात दिवसेंदिवस वाढत असल्याचेही राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-कर्जफेडीचा कालावधी दोन वर्षांपर्यत वाढविणे शक्य; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती