महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...नाहीतर तुमचे तुकडे-तुकडे होतील, राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला सल्ला - राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला चेतावणी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सल्ला दिला आहे. इमानरदारीने दहशतवाद बंद करा, अन्यथा पाकिस्तान आधीच दोन भागामध्ये वाटला गेला आहे. आता अनेक तुकडे-तुकडे होतील, असे राजनाथ म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By

Published : Oct 13, 2019, 7:46 PM IST

नवी दिल्ली -संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सल्ला दिला आहे. इमानरदारीने दहशतवाद बंद करा, अन्यथा पाकिस्तान आधीच दोन भागांमध्ये वाटला गेला आहे. आता अनेक तुकडे-तुकडे होतील, असे राजनाथ म्हणाले.


मी पूर्ण विनम्रतेने पाकिस्तानला, इमानदारीने दहशतवादाला संपवा, बंधूत्व राखण्याचा सल्ला देऊ इच्छितो. आपण शेजारी आहोत. आम्ही सोबत चालू इच्छितो. जर तुम्ही प्रामाणिकपणे दहशतवादाविरूद्ध लढत नसाल तर मी स्पष्टपणे सांगतो की, कट्टरपंथी शक्तींचा सामना करण्याची क्षमता भारतामध्ये आहे, अशी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे.

हेही वाचा -'या' माय-लेकांनी मन जिंकलं; पाहा बातमी वाचताना लाईव्ह टीव्हीवर काय झालं.

यापुर्वीदेखील हुतात्मा झालेल्या १२२ सैनिकांच्या स्मरनार्थ आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ यांनी पाकिस्तानला दहशतवादाला संपवण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तान आपल्या देशातील अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करू शकत नाही आणि ते मानवी हक्कांबद्दल बोलत आहेत. याचबरोबर पाकिस्तानकडून घुसखोरी झाली तर आमची सैन्य तयार आहेत. कोणताही घुसखोर भारतातून जिवंत परत जाणार नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details