ग्वाल्हेर - मध्यप्रदेशातील सिंधिया मराठा राजघराण्यातील राजमाता विजया राजे सिंधिया यांची १२ ऑक्टोबरला जन्मशताब्दी आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्र सरकार राजमाता विजया राजे सिंधिया यांचे छायाचित्र असलेले १०० रुपयांचे नाणे जारी करणार आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. मोदींच्या हस्ते या नाण्याचे अनावरण होणार आहे.
मराठा राजघराण्याचा गौरव; विजयाराजे सिंधियांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे नाणे जारी कसे असेल १०० रुपयांचे नाणे ?
नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असणार आहे. त्यात ३५ टक्के चांदी, ४० टक्के तांबे आणि पाच टक्के जस्त आणि निकेल असणार आहे. राजमाता यांची कन्या आणि मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले आहेत. 'हा एक अविस्मरणीय क्षण असेल. राजमाता यांच्या जन्मशताब्दीला पंतप्रधान मोदी त्यांच्या नावाचे नाण्याचे उद्धाटन करणार आहेत. आम्ही सर्वजण या क्षणाचे साक्षीदार बनण्यास उत्सुक आहोत', अशा भावना यशोधरा राजे सिंदिया यांनी व्यक्त केले.
दरवर्षी राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जन्मदिनी भाजप भव्य कार्यकमाचे आयोजन करत असते. यावर्षीही भाजपने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंहही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते व्हर्च्युअली कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.