महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 27, 2020, 8:51 AM IST

ETV Bharat / bharat

पंतप्रधान सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज साधणार संवाद, लॉकडाऊनसंदर्भात होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यात लॉकडाऊनसंदर्भात चर्चा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. मोदींनी 24 मार्चला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. यानंतर कोरोनाचा वाढता प्रसार पाहता हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

पंतप्रधान सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत साधणार संवाद
पंतप्रधान सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत साधणार संवाद

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यात लॉकडाऊनसंदर्भात चर्चा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. याआधीही पंतप्रधानांनी दोन वेळा अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला होता. ज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती.

मोदींनी 24 मार्चला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. यानंतर कोरोनाचा वाढता प्रसार पाहता हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनची घोषणा करण्याआधी पंतप्रधानांनी 20 मार्चला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. तर, लॉकडाऊनदरम्यान 11 एप्रिललाही सर्व मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधत मोदींनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले होते. यासोबतच सर्व राज्यांनी एकत्र येऊन या विषाणूविरोधात लढा दिल्याने त्यांनी सर्वांची स्तुतीदेखील केली होती

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, रविवारपर्यंत भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 26 हजार 917 वर पोहोचली आहे. यातील 5 हजार 914 रुग्ण बरे झाले आहेत, काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर, 826 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details