नवी दिल्ली - फ्रान्स आणि भारत यांच्यात १ जुलैपासून युद्धाभ्यास चालू होत आहे. यामध्ये भारताचे लढाऊ विमान सुखोई फ्रान्सच्या राफेर विमानासोबत सराव करणार आहे. या युद्धाभ्यासाला 'गरुड' असे नाव देण्यात आले आहे.
सुखोई विमाने आता राफेलसोबत करणार युद्धाभ्यास - france
भारतीय वायुसेनेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास असणार आहे. यामध्ये जवळपास १५० पेक्षा जास्त लढाऊ विमाने आणि अधिकारी सहभाग घेणार आहेत.
सुखोई विमान
भारतीय वायुसेनेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास असणार आहे. यामध्ये जवळपास १५० पेक्षा जास्त लढाऊ विमाने आणि अधिकारी सहभाग घेणार आहेत. अभ्यासात सुखोई व्यतिरिक्त ७८ टँकर्स, आयएल-७६ अवाक्स टोही विमान भाग घेणार आहेत. गरुड युद्धाभ्यासांतर्गत भारत आणि फ्रान्स यांच्यातील हा सहावा युद्धाभ्यास आहे. पहिला गरुड युद्धाभ्यास २००३ साली ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे झाला होता.