महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 69 लाख 6 हजार 151वर पोहोचली आहे. तर, 1 लाख 6 हजार 490 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकेडवारी पाहता, सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Oct 9, 2020, 1:23 PM IST

नवी दिल्ली -देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 69 लाख 6 हजार 151 वर पोहोचली आहे. तर, मागील 24 तासांत 70 हजार 496 रुग्णांची भर पडली. तसेच 964 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी...

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 8 लाख 93 हजार 592 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 59 लाख 6 हजार 70 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 6 हजार 490 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र -राज्यात सर्वाधिक 2 लाख 42 हजार 438 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 39 हजार 430 जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटक - राज्यात 1 लाख 17 हजार 162 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, आतापर्यंत 9 हजार 675 जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळ -राज्यात 90 हजार 664 जणांवर उपचार सुरु आहेत. तर, 930 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 लाख 67 हजार 256 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आंध्र प्रदेश - राज्यात 48 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, आतापर्यंत 6 लाख 84 हजार 930 रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत 6 हजार 128 रुग्ण दगावले.

दिल्ली - राजधानीत 22 हजार 232 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 2 लाख 72 हजार 948 कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 5 हजार 653 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details