महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरात मागील २४ तासात आढळले ६१ हजार २६७ नवे रूग्ण; ८८४ जणांचा मृत्यू - India coronavirus count

देशभरात मागील २४ तासात 61 हजार 267 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 884 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी कोरोना रुग्णांची एकुण संख्या ६६ लाख ८५ हजार ८२ वर पोहोचली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या माहितीनुसार ५ ऑक्टोंबरपर्यंत देशभरात ८ कोटी १० लाख ७१ हजार ७९७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मागील २४ तासात आढळले ६१ हजार २६७ नवे रूग्ण
मागील २४ तासात आढळले ६१ हजार २६७ नवे रूग्ण

By

Published : Oct 7, 2020, 1:23 AM IST

नवी दिल्ली: देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ६६ लाख ८५ हजार ८२ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात ६१ हजार २६७ रुग्णांची भर पडली. तसेच ८८४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात ९ लाख १९ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ५६ लाख ६२ हजार ४९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील २४ तासात आढळले ६१ हजार २६७ नवे रूग्ण

महाराष्ट्र- राज्यात सर्वाधिक २ लाख ५२ हजार ७२१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत ३८ हजार ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ लाख ६२ हजार ५८५ रुग्ण बरे झाले आहेत.

कर्नाटक- राज्यात १ लाख १५ हजार ४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत ५ लाख २२ हजार ८४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

केरळ- राज्यात आतापर्यंत १ लाख ४९ हाजर १११ रुग्ण बरे झालेत. तर ८५९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात ८४ हजार ९५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आंध्र प्रदेश - राज्यात ५१ हजार ६० रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत ६ लाख ६६ हजार ४३३ रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत ६ हजार १९ रुग्ण दगावले.

दिल्ली- राजधानी दिल्लीत आतापर्यंत २ लाख ६३ हजार ९३८ जण बरे झालेत, तर आतापर्यंत ५ हजार ५४२ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत २३ हजार ८० रुग्णांवर उपचार सुरू.

ABOUT THE AUTHOR

...view details