नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी 65 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 75 हजार 829 कोरोना रुग्ण आढळले असून 940 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, सर्वांत जास्त 37 हजार 758 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामुक्त झाल्याचा आकडेवारी 55 लाख आहे. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 84.13 टक्क्यांवर पोहचला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला 65 लाखांचा टप्पा; तर रिकव्हरी रेट 84.13 टक्क्यांवर - कोरोना लेटेस्ट न्यूज
एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 65 लाख 49 हजार 374 वर पोहचली आहे. यामध्ये 9 लाख 37 हजार 625 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, देशातील कोरोना चाचणीचा आकडा वाढला असून शनिवारी दिवसभरामध्ये 11 लाख 42 हजार 131 चाचण्या झाल्या आहेत.
कोरोना अपडेट
एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 65 लाख 49 हजार 373 वर पोहचली आहे. यामध्ये 9 लाख 37 हजार 625 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 55 लाख 9 हजार 966 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर आतापर्यंत 1 लाख 1 हजार 782 जणांचा बळी गेला आहे.
देशातील कोरोना चाचणीचा आकडा वाढला असून शनिवारी दिवसभरामध्ये 11 लाख 42 हजार 131 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण 7 कोटी 89 लाख 92 हजार 534 चाचण्या पार पडल्या आहेत.