नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णांनी 60 लाखांचा टप्पा पार पडला आहे. गेल्या 24 तासांत 82 हजार 170 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची आकडेवारी 95 हजार 542 वर पोहचली आहे. तर, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 60 लाख 74 हजार 702 झाली आहे.
COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर.. - कोरोना रुग्ण अपडेट
कोरोनामुळे सर्वांत जास्त 35 हजार 571 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 9 हजार 313 आणि उत्तर प्रदेशमध्ये 5 हजार 594 जणांचा बळी गेला आहे. तसेच, कर्नाटकमध्ये 8 हजार 582, आंध्र प्रदेशमध्ये 5 हजार 708 आणि दिल्लीत 5 हजार 235 मृत्यू झाले आहेत.
कोरोनामुळे सर्वांत जास्त 35 हजार 571 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 9 हजार 313 आणि उत्तर प्रदेशमध्ये 5 हजार 594 जणांचा बळी गेला आहे. तसेच कर्नाटकमध्ये 8 हजार 582, आंध्र प्रदेशमध्ये 5 हजार 708 आणि दिल्लीत 5 हजार 235 मृत्यू झाले आहेत.
देशात 1 हजार 832 चाचणी प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 1 हजार 87 शासकीय तर, 745 खासगी प्रयोगशाळा आहेत. रविवारी दिवसभरात 7 लाख 9 हजार 394 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 19 लाख, 67 हजार 230 एवढी झाली आहे.