जयपूर - राजस्थानातील पोखरण येथे आज भारताकडून स्वदेशी बनावटीच्या एंटीटँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) म्हणजेच ‘नाग’चे यशस्वी परीक्षण केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या या यशाबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे कौतुक केले आहे. 'नाग' हे तिसऱ्या पिढीतील रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.
भारताकडून रणगाडा भेदी ‘नाग’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण
संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपनास्त्र असलेल्या नागची मारक क्षमता ८ किलोमीटर आहे. नाग हे तिसऱ्या पिढीतील रणगाडा भेदी क्षेपणास्त्र आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल 'डीआरडीओ'चे कौतुक केले आहे.
'नाग' क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये -
भारताला या क्षेपणास्त्रासाठी 350 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. यात उच्च क्षमतेची उपकरणे बसविण्यात आली असून अधिक तापमानात देखील क्षेपणास्त्र त्याची दिशा भटकत नाही. या क्षेपणास्त्राला 10 वर्षांपर्यंत कोणतीही देखभाल न करता वापरले जाऊ शकते. नाग क्षेपणास्त्र वजनाने अत्यंत हलके असून, एकूण वजन केवळ 42 किलो आहे. नाग क्षेपणास्त्राचा वेग 230 मीटर प्रतिसेकंद इतका आहे. हे क्षेपणास्त्र एकदा डागण्यात आल्यावर ते रोखता येत नाही. याचा मारक पल्ला क्षमता 8 किलोमीटर असून 2018 च्या अखेरपर्यंत याचा सैन्यात समावेश केला जाऊ शकतो.