नवी दिल्ली - सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. विशेष म्हणजे ही चर्चा सीमापार चीनच्या भूमीत मोल्डो येथे होत आहे. त्यात लडाखमधील संघर्षाबद्दल चर्चा केली जाणार आहे. कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेचा ही पाचवी वेळ आहे.
भारताची चीनच्या भूमीत जाऊन चर्चा ; कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची ही पाचवी वेळ
सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे.
यापूर्वी भारत आणि चीनमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची 4 वेळा बैठक झाली आहे. 6, 22, 30 जुन तर 14 जुलैला चर्चा पार पडली होती. सीमेवरील तणाव कमी करुन शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. बैठकीत सैनिक सिमेवरून मागे सरकवण्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. सिमेवरून चीन सैन्य मागे घेत आहे. मात्र, संपूर्ण प्रकिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला होता. या वेळी भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी कसा करता येईल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. मात्र, चीनकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. चीनच्या आक्रमक धोरणामुळे भारत चीन सीमेवरील शांततेचा भंग झाला आहे.