चेन्नई - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राअध्यक्ष भारतात येत आहेत. आज ममल्लापूरममध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचे स्वागत करण्यासाठी ममल्लापूरममध्ये जय्यत तयारी सुरू आहे. ममल्लापूरममध्ये युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे.
चेन्नईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील शी जिनपिंग यांच्या आगमनाच्या निमित्ताने सुशोभित करण्यात आले आहे.'चेंडा मेलम' हा तामिळनाडूचा पारंपरिक गीतप्रकार सादर करणाऱ्या लोकांचा समूहदेखील या विमानतळाबाहेर जिनपिंग आणि मोदींची वाट पाहत उभा आहे.
तर, ममल्लापूरमच्या 'पंच रथ'जवळ मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागतासाठी १८ प्रकारची फळे आणि भाज्या वापरून विशेष कमान उभी करण्यात आली आहे.