नवी दिल्ली - अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा एलएसीवरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात रविवारी चर्चा झाली. ही चर्चा चीनच्या हद्दीतील माल्डो या भागात झाली असून भारताकडून लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी नेतृत्व केले. यात एलएसी सीमारेषेवर मे महिन्यात जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती निर्माण करण्यात यावी आणि चीनी सैनिकांनी माघार घ्यावी, असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मे महिन्यानंतर भारत-चीन सीमारेषेवर तणाव वाढला. यानंतर दोन्ही देशांचे ५०-५० हजार सैनिक लडाखमध्ये तैनात करण्यात आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांदरम्यान नववी बैठक पार पडली आहे.
भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे की, सीमारेषेवरिल सैनिकांना मागे बोलावून तणावर कमी करण्याची जबाबदारी चीनची आहे. याआधी झालेल्या ७ व्या बैठकीत चीनने पेगोंग नदीच्या दक्षिणी भागात तैनात असलेले भारतीय सैन्य हटवण्यास सांगितले होते. १२ ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या या बैठकीत, भारताने सर्व ठिकाणावरिल सैन्य परत बोलावण्याची प्रक्रिया एकावेळेस सुरूवात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.