नवी दिल्ली -आज संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदात आणि उत्साहाने साजरी केली जात आहे. या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सभी देशवासियों को दीपावली की हार्दिक मंगलकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2020
Wishing everyone a Happy Diwali! May this festival further brightness and happiness. May everyone be prosperous and healthy.
एक दिवा जवानांसाठी
या दिवाळीला एक दिवा आपल्या सैन्य दलातील जवानांसाठी लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. देशातील जनतेने जवानांना एक सलाम म्हणून हे दिवे लावावे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'या दिवाळीला आपण सैन्य दलातील जवानांना सलामी देण्यासाठी एक दिवा लावावा. जवान निर्भीड होऊन देशाची सेवा करतात. आमचे शब्द सैन्य दलातील जवानांच्या साहसासाठी त्यांच्या प्रती आभाराची भावनेसोबत न्याय नाही करु शकत. आम्ही सीमेवरील जवानांच्या परिवाराच्या प्रती आभारी आहोत.'
यंदा दिवाळी धैर्य आणि आशेचा किरण-
नरेंद्र मोदी म्हणाले, 'सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आपल्या आयुष्यात अधिक प्रकाश आणि आनंद देईल. सर्व लोक समृद्ध आणि निरोगी असतील. यंदा दिवाळी धैर्य आणि आशेचा किरण आहे. कारण जग कोरोना संसर्गाच्या वाईट अवस्थेतून जात आहे. अशा परिस्थितीत आपण धैर्य बाळगू या.