श्रीनगर - पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून काश्मीरातील सीमेवर अनेक ठिकाणी गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी लष्करही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला आहे.
पाकिस्तानी दहशतवादी चौक्यांवर भारतीय लष्कराचा हल्ला - terrorist launch pad
कुपवाडा जिल्ह्यातील केरेन सेक्टरमध्ये सर्वात जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने तेथील दहशतवादी तळ आणि लष्करी चौक्यांवर अचून मारा केला.
संग्रहित छायाचित्र
कुपवाडा जिल्ह्यातील केरेन सेक्टरमध्ये सर्वात जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने तेथील दहशतवादी तळ आणि लष्करी चौक्यांवर अचून मारा केला. यामध्ये दहशतवादी तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. संरक्षण खात्याच्या प्रवक्तत्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी बाजूने ज्या ठिकाणी मशीनगन ठेवल्या होत्या त्याच ठिकाणांवर हा मारा करण्यात आला आहे.