नवी दिल्ली - चीन आणि पाकिस्तानने लडाख सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने मनाली ते लेह या नव्या तिसऱ्या लिंक रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या रस्त्यामुळे लडाख आणि देशातील इतर भागास जोडणार आहे.
भारत मागील तीन वर्षांपासून दौलत बेग ओल्डी या भागातील पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. हा रस्ता जगातील दुर्गम अशा खारडूंगला पास भागात होत आहे. येथील पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्यानंतर भारताला आपल्या सैन्य दलाची हालचाल वेगाने करता येणार आहे.