महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-अमेरिकेची प्रादेशिक व जागतिक विषयांवर चर्चा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पॉम्पेओ यांच्यामध्ये चर्चा झाली. शुक्रवारी पार पडलेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक विषयांसह दक्षिण आशिया, अफगाणिस्तान, भारत-पॅसिफिक, इ विषयांवर बतचीत झाली आहे.

Indo-US relations
भारत-अमेरिकेची प्रादेशिक व जागतिक विषयांवर चर्चा

By

Published : Aug 7, 2020, 3:32 PM IST

नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पॉम्पेओ यांच्यात 'क्वाड' या आंतरराष्ट्रीय संघटनेबाबत चर्चा झाली. भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या चार देशांचा समावेश या संघटनेत आहे.

फोनवर पार पडलेल्या संभाषणादरम्यान उभयतांत अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत सहकार्य आणि कोविड विरोधातील लढा बळकट करण्यासंदर्भात कटीबद्धता दाखवण्यात आली.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संबंधित संभाषणासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. माइक पॉप्मेओ यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. द्विपक्षीय संंबंध बळकट करण्यासाठी दोन्ही देश कटीबद्ध असून दोन्ही देशांच्या सहकार्याचा आढावा घेण्यात आल्याचे ट्वीटमध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. तसेच दक्षिण आशिया, अफगाणिस्तान, भारत-पॅसिफिक आणि अन्य विषयांवर चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिलीय.

कोरोनाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी विचारांचे आदान-प्रदान झाले. तसेच येणाऱ्या काळात क्वाड संघटनेची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधी चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

यावर प्रत्युत्तर देताना, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत महामारी विरोधातील लढ्याबद्दल तसेच भारत-अमेरिका संंबंधांबाबत उत्तम संभाषण झाल्याचे पॉप्मेओ यांनी सांगितले. अफगाणिस्तानात शांतता राखण्यासाठी तसेच इंडो-पॅसिफिक समुद्र प्रांतातील सार्वभौमता कायम राखण्याच्या दिशेने दोन्ही देश पावले उचलत असल्याचे त्यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details