नवी दिल्ली :लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये दहा दिवसांपूर्वी दोन भीषण स्फोट झाले होते. त्यानंतर मदत म्हणून भारताने औषधे, अन्नाची पाकिटे आणि इतर अत्यावश्यक वस्तू बैरुतला पाठवल्या आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली.
लेबनॉनमध्ये झालेल्या दुर्देवी स्फोटांनंतर, तेथील नागरिकांच्या पाठिशी भारत उभा आहे. ५८ मेट्रिक टन आपत्कालीन मानवतावादी मदत, ज्यामध्ये अत्यावश्यक औषधे आणि अन्नाचा समावेश आहे हे आयएएफ सी१७ या विमानाने बैरुतला पोहोचत आहे. अशा आशयाचे ट्विट जयशंकर यांनी शुक्रवारी केले.