संयुक्त राष्ट्र- जगभरात गेल्या 50 वर्षात 14 कोटी 26 लाख महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी 4 कोटी 58 लाख महिला भारतातील आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने मंगळवारी एका अहवाल सादर केला. यात बेपत्ता महिलांची संख्या चीन आणि भारतात सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा-देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने (यूएनएफपीए) मंगळवारी जाहीर केलेल्या 'ग्लोबल पॉप्युलेशन स्टेटस 2020' च्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या 50 वर्षांत बेपत्ता महिलांची संख्या दुपटीने वाढली आहे. ही संख्या 1970 मध्ये 10 लाख होती. 2020 मध्ये ती वाढून 4 कोटी 58 झाली आहे. तर चीनमध्ये 23 लाख महिला बेपत्ता आहेत.
बेपत्ता महिला | वार्षिक महिला मृत्यू दर | 2020 मध्ये जन्मल्यानंतर बेपत्ता मुली |
जगभरात- 14.26 कोटी | जगभरात 17.1 लाख | जगभरात- 15 लाख |
भारतात- 4.58 कोटी | भारतात- 3.60 लाख |