चेन्नई - 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. तो म्हणजे महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे,' असे वादग्रस्त विधान मक्कल निधी मय्यमचे प्रमुख कमल हसन यांनी केले आहे. त्यांनी रविवारी तमीळनाडूतील अरीवाकुरीची लोकसभा मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान हे वक्तव्य केले. येथे १९ मे रोजी मतदान होणार आहे. कमल यांनी अभिनय क्षेत्राकडून येऊन नुकतेच राजकारणात पदार्पण केले आहे.
नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी - कमल हसन - india
'अरीवाकुरीची या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या जास्त आहे म्हणून मी गोडसेला दहशतवादी म्हणत नाही. तर, मी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभा राहून हे बोलत आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी एक हिंदू होता. तो म्हणजे नथुराम गोडसे,' असे हसन यांनी सांगितले.
देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू दहशतवादाच्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, कमल हसन यांच्या या विधानाने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. 'अरीवाकुरीची या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या जास्त आहे म्हणून मी गोडसेला दहशतवादी म्हणत नाही. तर, मी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभा राहून हे बोलत आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी एक हिंदू होता. तो म्हणजे नथुराम गोडसे,' असे हसन यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे उमेदवार एस. मोहनराज हेही उपस्थित होते.
'आपल्या राष्ट्र ध्वजातील तिन्ही रंग जसे आहेत, तसेच ते कायम ठेवण्याची मनापासून इच्छा आहे. मी एक सच्चा भारतीय आहे आणि मी हे छातीवर हात ठेवून अभिमानाने सांगू शकतो,' असे हसन यांनी म्हटले आहे.