नवी दिल्ली - देशभरात ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जल्लोषात सुरु आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्वातंत्र्याचा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी लाल किल्ल्यावर मोठी गर्दी केली आहे.
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना जगापुढे उघडं पाडू - मोदी
दहशतवाद पसरवणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू राहतील. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना जगापुढे उघडं पाडू. शेजारील देशांनाही दहशतवादाने घेरलं आहे. जल, थल, नभ तिन्हीमध्ये लष्कर प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न गरजेचे - मोदी
स्वातंत्र्य दिन
LIVE UPDATE -
- तिन्ही सेनादलाचे नेतृत्त्व करण्यासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स' पद निर्माण करण्याची मोदींची घोषणा
- दहशतवाद पसरवणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू राहतील. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना जगापुढे उघडं पाडू. शेजारील देशांनाही दहशतवादाने घेरलं आहे. जल, थल, नभ तिन्हीमध्ये लष्कर प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न गरजेचे
- ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था सर्वांच्या प्रयत्नातूनच शक्य, अवघड गोष्ट शक्य करून दाखवू
- भारतात लोकसंख्या विस्फोट होतोय. देशात जनजागृतीची गरज.
- जल जीवन मिशनसाठी साडेतीन लाख कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली
- पाणी संकट टाळण्यासाठी जल जीवन मिशन पुढे नेणार. केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करणार. लोकांना शुद्ध पाणी घरामध्ये मिळण्यासाठी प्रयत्न करणार. पाण्याच्या क्षेत्रामध्ये ७० वर्षात जे काम झाले. त्याच्या ४ पट काम या ५ वर्षात करणार.
- एक देश एक निवडणुकांवर देशात चर्चा व्हायला हवी
- प्रत्येक देशवासी आता गर्वाने म्हणेल 'एक देश एक राज्यघटना'
- काश्मीरात ७० वर्ष फक्त दहशतवाद, परिवारवाद आणि फुटीरतावाद फोफावला
- लडाख आणि काश्मिरातील आदिवासी जमातींना आता राजकीय हक्क मिळतील
- ७० वर्षांपासून अडकलेला काश्मीर प्रश्न ७० दिवसांच्या आत सोडवला. ३७० कलम रद्द केले.
- संकल्प, स्वाभिमान असेल तर देश यशस्वी होऊ शकतो.
- २०१९ मध्ये भाजप सरकारमुळे निराशा आशामध्ये बदलली, देश बदलण्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली. पहिल्या ५ वर्षात सरकारने लोकांचा विश्वास संपादन केला. दुसऱ्या कार्यकाळात लोकांची सेवा करण्याची अजून शक्ती मिळाली
- पंतप्रधान मोदींनी देशवासियांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या
- सरकारला १० आठवडे झाले या काळातच अनेक कामे हाती घेतली, ३७० कलम हटवले, तिहेरी तलाक कायदा आणला.
- जलसंकट टाळण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली
- मेडिकल एज्युकेशनला पारदर्शक करण्यासाठी सरकार कायदे आणत आहे.
पंतप्रधान मोदींनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधीचे दर्शन घेतले आहे. थोड्याच वेळात ते देशाला संबोधित करणार आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताला युद्धाची दर्पोक्ती देत आहे. कालच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेतून भारताला युद्धाची धमकी दिली. यावर मोदी काय उत्तर देतात. यावर सर्वांची उत्सुकता वाढली आहे.
Last Updated : Aug 15, 2019, 11:28 AM IST