महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

15 ऑगस्ट 1947 : भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

सर्व देश आनंद साजरा करत होता पण या आनंदात महात्मा गांधी मात्र सामील झाले नाहीत... 15 ऑगस्ट या दिवशी इतर तीन देशांचाही स्वातंत्र्य दिन...

15 ऑगस्ट 1947 : भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या या 7 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

By

Published : Aug 15, 2019, 10:13 AM IST

Updated : Aug 15, 2019, 10:19 AM IST

मुंबई - आज 15 ऑगस्ट भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य दिनाशी निगडित 5 मनोरंजक गोष्टी सांगणार आहेत.

15 ऑगस्ट आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनाशी निगडित 5 मनोरंजक गोष्टी

1) 15 ऑगस्ट या दिवशी इतर तीन देशांचाही स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्टला भारता शिवाय तीन इतर देशांचा देखील स्वतंत्रता दिवस आहे. दक्षिण कोरिया जपानकडून 15 ऑगस्ट 1945 ला स्वतंत्र झाला होता. ब्रिटनकडून बहरीन 15 ऑगस्ट 1971 ला आणि फ्रान्सकडून कांगो 15 ऑगस्ट 1960 स्वतंत्र झाले होते.

2) दोन देशांच्या सीमा स्वातंत्र्य मिळाले तरी निश्चित नव्हत्या
15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाले होते, मात्र या देशांच्यामध्ये सीमा रेषा निर्धारित झाल्या नव्हता. याचा निर्णय 17 ऑगस्टला रेडक्लिफ लाइनच्या घोषणेद्वारे करण्यात आला होता.

3) भारत स्वतंत्र होत होता मात्र गांधीजी या आनंदोत्सवात सहभागी नव्हते
महात्मा गांधी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिल्लीहून हजारो किलोमीटर दूर बंगालच्या नोआखलीमध्ये होते, जेथे त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधील सांप्रदायिक हिंसेला रोखण्यासाठी उपोषण केले होते.

4) मी दंगा रोखताना आपला जीव देईल.. महात्मा गांधी
भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र होणार आहे, हे निश्चित झाल्यानंतर जवाहर लाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांनी महात्मा गांधींना लाल किल्ल्यावर उत्सवात सहभागी होण्यास लिहिले होते, गांधीजींनी नेहरू आणि पटेल यांच्या पत्राला उत्तर देताना लिहिले होते, "जेव्हा कलकत्तामध्ये हिंदू-मुस्लिम एक दुसऱ्यांचा जीव घेत आहे, अशा परिस्थितीत मी लाल किल्ल्यावरील या उत्सवात सामील कसा होऊ शकतो. मी दंगा रोखण्यासाठी आपला जीव देऊ शकतो."

5) स्वातंत्र्यावेळी भारताला कोणतेही राष्ट्रगीत नव्हते
भारत 15 ऑगस्ट आझाद जरूर झाला, पण त्याचे कुठले ही राष्ट्रगीत नव्हते. रवींद्रनाथ टागोर यांचे जन-गण-मन हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणा गीत होते, तेच राष्ट्रगीत म्हणून 1950 मध्ये स्वीकारण्यात आले.

Last Updated : Aug 15, 2019, 10:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details