नवी दिल्ली -आज भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी वाघा-अटारी सीमेवर बिटिंग द रिट्रीट हा विशेष सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी भारतीयांनी वाघा सीमेवर मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचे दिसून आले. दरम्यान, भारतीय लष्कराच्या जवानांनी या सोहळ्यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणेने भारतीयांमध्ये देशभक्ती जावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर देशभरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
आज अटारी-वाघा सीमेवर बीएसएफच्या जवानांनी स्वातंत्र्य दिनासह रक्षाबंधनही साजरा केला. यावेळी सीमेवर आलेल्या महिलांनी बीएसएफच्या जवानांना राख्या बांधल्या.
बीएसएफच्या जवानांनी स्वातंत्र्य दिनासह रक्षाबंधन उत्साहात साजरा केला अटारी वाघा सीमेवरील समारंभात बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा देखील उपस्थित होते. यावेळी मिठाई वाटली. वाघा-अटारी सीमेवर मोठ्या जल्लोषात बिटिंग द रिट्रीट हा विशेष सोहळा पार पडला आहे
स्वातंत्र्यादिनाच्या निमित्ताने अटारी-वाघा सीमेवर देशभरातून येणारे कलाकार आपली कला दाखवतात.
स्वातंत्र्यादिनाच्या निमित्ताने अटारी-वाघा सीमेवर देशभरातून येणारे कलाकार आपली कला दाखवतात. स्वातंत्र्यादिनाच्या निमित्ताने अटारी-वाघा सीमेवर देशभरातून येणारे कलाकार आपली कला दाखवतात. गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. काश्मीरच्या मुद्यावर दोन्ही देश आमनेसामने आहेत. त्यामुळे अटारी-वाघा सीमेवरील सैनिकांनी स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी आणि बकरी ईदच्या दिवशी दोन्ही देशांदरम्यान मिठाईची देवाणघेवाण झाली नाही.
अटारी वाघा सीमेव्यतिरिक्त प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवसानंतर म्हणजेच 29 जानेवारीला बिटिंग द रिट्रीट समारंभ आयोजित केला जातो. हा सोहळा राजपथ येथे आयोजित करण्यात येतो. संध्याकाळी विजय चौक येथे होणाऱ्या या सोहळ्यात भारतीय सैन्य आपली शक्ती व संस्कृतीचे प्रदर्शन करते.
संध्याकाळी का साजरा होतो-
सैन्य इतिहासात ही परंपरा जुनी आहे. ब्रिटनमध्ये १६ व्या शतकात याची सुरुवात झाली. सूर्यास्ताच्या वेळी सैनिक युद्धभूमीवरून आपल्या शिबीराकडे रवाना होत, त्यावेळी बंदुकीची एक गोळी झाडून, ड्रम, पाईप यांसारखे वाद्य वाजवत हा सोहळा पार पाडला जाई. सैन्याचे मनोबल टिकून राहावे, त्यांचा ताण कमी व्हावा यासाठी या प्रकारचे आयोजन केले जाई. कालऔघात त्याचे स्वरूप बदलत गेले. आधी हा सोहळा 'वॉच सीटिंग' या नावाने ओळखला जाई.
दोनदा रद्द झालाय हा कार्यक्रम-
पहिल्यांदा 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्यांदा 27 जानेवरी 2009 रोजी देशाच्या 8 वे राष्ट्रपती व्यंकटारामन यांचे निधन झाल्यानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोट्यवधी भारतीय दूरचित्रवाणीवर बघतातच. मात्र हा सोहळा एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवावा असाच आहे.