नवी दिल्ली - देशभरामध्ये सध्या अनलॉक 1.0 सुरू आहे. ज्यामध्ये टप्याटप्याने खासगी कार्यालय, उद्योगधंदे आणि इतर गोष्टी सुरू केल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात इत्यादी. राज्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी तातडीची बैठक बोलावली. यात त्यांनी रुग्णांची संख्या वाढत असणाऱ्या राज्यांमध्ये कंटेनमेंट झोन वाढवण्याबद्दल भर दिला आहे. महाराष्ट्राच्या कोविड १९ परिस्थितीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होते.
महाराष्ट्रातील कंटेनमेंट झोनच्या संख्येत वाढ करण्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सुचना - COVID-19
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, भविष्यातील धोका ओळखून आपल्याला राज्यातील आयसीयू, व्हेटीलेटर्स आणि प्रयोगशाळांची संख्या वाढण्यावर भर दिला पाहिजे. तसेच ते म्हणाले महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या भागामध्ये कंटेनमेंट झोनसाठी व्यवस्थित नियोजन करू त्याची अंमलबजावणी करा. तसेच जास्तीत जास्त कोविड १९ चाचण्या करण्याच्या सूचना डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारला दिल्या आहेत. या बैठकीमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असेलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश होता. बैठकीमध्ये औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि पालघर या जिल्ह्यांच्या कोविड परिस्थितीबद्दल जास्त चर्चा करण्यात आली.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, भविष्यातील धोका ओळखून आपल्याला राज्यातील आयसीयू, व्हेटीलेटर्स आणि प्रयोगशाळांची संख्या वाढण्यावर भर दिला पाहिजे. तसेच ते म्हणाले महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे.