महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशात गोशाळेला देणगी दिल्यास प्राप्तिकरात सूट - गोशाळांना दान दिल्यास प्राप्तिकरात सूट न्यूज

पशुवैद्यकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, गाय संरक्षण व गोरक्षणाच्या संवर्धनासाठी काही प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यानुसार, मध्यप्रदेश शासनद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या गोशाळांना आणि पशुधन संवर्धन संचलनालयांना दिली जाणारी रक्कम करमुक्त असणार आहे.

मध्य प्रदेश गोशाळा न्यूज
मध्य प्रदेश गोशाळा न्यूज

By

Published : Dec 2, 2020, 7:27 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशात गोशाळांना दान म्हणून काही रक्कम देणाऱ्यांना प्राप्तिकरात सूट देण्यात येणार आहे. यामध्ये ही गोशाळा नोंदणीकृत असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा -मध्य प्रदेश : धर्मांतरणासाठी पत्नीवर दबाव आणणाऱ्या पतीला अटक

पशुवैद्यकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, गाय संरक्षण व गोरक्षणाच्या संवर्धनासाठी काही प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यानुसार, मध्यप्रदेश शासनद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या गोशाळांना आणि पशुधन संवर्धन संचलनालयांना दिली जाणारी रक्कम करमुक्त असणार आहे. भारत सरकारच्या प्राप्तिकर विभागाच्या आयुक्तांनी ही बाब मान्य केली आहे. येथे दिले जाणारे दान करमुक्त असणार आहे.

राज्य सरकारने गोशाळांना देणगीदारांसाठी एक पोर्टलदेखील तयार केले असून यामार्फत गो-शाळांना चारा, पाणी, शेड व इतर कामांसाठी रक्कम दान करता येईल.

हेही वाचा -जंगली हत्तीने माणसाला पायदळी तुडवले!...पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details