नवी दिल्ली - बसपच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचे भाऊ आणि बसपचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांचा ४०० कोटींचा बेहिशेबी प्लॉट प्राप्तिकर विभागाने जप्त केला आहे. ही जमीन दिल्लीजवळच्या नोएडा भागात आहे. यामुळे मायावतींच्या भावासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
मायावतींच्या भावाचा ४०० कोटींचा बेहिशेबी प्लॉट जप्त, प्राप्तिकर विभागाची कारवाई
आनंद कुमार यांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर विभागाने छापा टाकत कारवाई केली.
आनंद कुमार यांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर विभागाने छापा टाकत ही कारवाई केली. १६ जुलैला या प्लॉटच्या जप्तीचे आदेश देण्यात आले होते. १८ जुलैला कारवाई पूर्ण झाली.
दरम्यान, आनंदकुमार यांच्या नावे आणखी बेहिशेबी संपत्ती आहे, असे प्राप्तिकर विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्या संपत्तीवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे. प्राप्तिकर विभागासह ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. जप्त करण्यात आलेला प्लॉट सात एकरांचा आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.