महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयकर विभागाकडून तीन कंपन्यांच्या विरोधात शोध मोहीम - income tax department search operation delhi

सीबीडीटीनुसार, दिल्ली आणि आसाममधील विविध ठिकाणी ही शोध मोहीम राबविण्यात आली. उत्तर-पूर्व विभागातील तीन प्रमुख कंपन्यांच्याविरोधात 22 डिसेंबरपासून ही शोध मोहीम सुरू होती. या कंपन्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी विभागाचाही समावेश आहे.

income-tax-department
आयकर विभाग

By

Published : Dec 26, 2020, 10:46 PM IST

नवी दिल्ली - आयकर विभागाने देशातील 14 विविध ठिकाणी तीन प्रमुख कंपन्यांच्या विरोधात शोध मोहीम राबविली. याबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) विभागाने माहिती दिली.

सीबीडीटीने काढले परिपत्रक -

सीबीडीटीनुसार, दिल्ली आणि आसाममधील विविध ठिकाणी ही शोध मोहीम राबविण्यात आली. उत्तर-पूर्व विभागातील तीन प्रमुख कंपन्यांच्याविरोधात 22 डिसेंबरपासून ही शोध मोहीम सुरू होती. या कंपन्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी विभागाचाही समावेश आहे. गुवाहटी, दिल्ली, सिलापाथर आणि पाठशाला येथील 14 वेगवेगळ्या ठिकाणी ही शोध मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती विभागाने परिपत्रक काढून दिली.

हेही वाचा -भाजपा सरकारमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय - अखिलेश यादव

100 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न -

गटातील काही घटक रोख स्वरूपात दागिने खरेदी करण्यात गुंतले आहेत. तसेच रोख खरेदीचा आराखडा देखील यात जोडला गेला. आतापर्यंत 9.79 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच उर्वरित दागिन्यांच्या संपादनाचा 2 कोटी रुपयांच्या दागिन्यांची पडताळणी सुरू असल्याची माहितीही विभागाने दिली. तर शोध आणि सर्वेक्षण कारवाई दरम्यान आतापर्यंत अंदाजे एकूण अघोषित उत्पन्न 100 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. तसेच एक लॉकरही सापडला आहे. त्याला उघडणे अद्याप बाकी असल्याचेही विभागाने सांगितले.

शोध मोहिमेदरम्यान, हे समोर आले आहे की, ज्या पेपरवर फक्त कर्ज घेतले होते त्यामधून कंपन्यांनी विक्री केली आणि खऱ्या स्वरुपात असा काहीही झालेले नाही. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शोधमोहिमेदरम्यान, हेदेखील समोर आले आहे की, एक समुहाद्वारे हॉस्टिटॅलिटी व्यापारात मोठ्या प्रमाणात ट्रान्जेक्शन्स झाली आहेत. हे देवाणघेवाण एकूण व्यापाराच्या 50 टक्के आहे. दरम्यान, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details