जयपूर- राजस्थानसह संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालात समोर आले आहे की, वृद्धांच्या तुलनेत २० ते ३० या वयोगटातील लोकांना कोरोनाची लवकर लागण होत आहे.
राजस्थानात २० ते ३० वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त..
राजस्थानातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण ४० वर्ष वयाचे आहेत. महिलांच्या तुलनेत कोरोनाची लागण पुरुषांना जास्त होत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना हा वृध्दांनाच होतो असा एक समज झालेला होता. मात्र, या अहवालातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. २० ते ३० आणि ३० ते ४० या वयोगटातील लोकांनाच जास्त प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. राजस्थानातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण ४० वर्ष वयाचे आहेत. महिलांच्या तुलनेत कोरोनाची लागण पुरुषांना जास्त होत असल्याचेही या अहवालाता नमूद करण्यात आले आहे.
- कोरोना वायरस से संक्रमित मरीजों के आंकड़े:
उम्र: | जनसंख्या प्रतिशन: | संक्रमित मरीज: |
0 ते 10 वर्ष | लोकसंख्या 25. 37 टक्के | 5.93 टक्के संक्रमित |
10 ते 20 वर्ष | लोकसंख्या 22.72 टक्के | 15.75 टक्के संक्रमित |
20 ते 30 वर्ष | लोकसंख्या 17.13 टक्के | 22.22 टक्के संक्रमित |
30 ते 40 वर्ष | लोकसंख्या 13.01 टक्के | 19.53 टक्के संक्रमित |
40 ते 50 वर्ष | लोकसंख्या 9.56 टक्के | 19.53 टक्के संक्रमित |
50 ते 60 वर्ष | लोकसंख्या 6.06 टक्के | 11.33 टक्के संक्रमित |
60 ते 70 वर्ष | लोकसंख्या 4.01 टक्के | 08.09 टक्के संक्रमित |
70 ते 80 वर्ष | लोकसंख्या 1.61 टक्के | 02.48 टक्के संक्रमित |
80 ते 90 वर्ष | लोकसंख्या 0.41 टक्के | 01.08 टक्के संक्रमित |
90 ते 100 वर्ष | लोकसंख्या 0.12 टक्के | 00.00 |
दरम्यान, मृतांचा वयोगट वेगळा असल्याचे दिसून येते. कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात तरुणांना होत असली तरीही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या लोकांचाच समावेश आहे.