महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना कर्मवीर : दोन जीवांची असूनही 'ती' कोरोनाशी करतेय दोन हात

सध्या कोरोनाचे महासंकट ओढावले असताना आरोग्य विभागातील प्रत्येकजण त्याच्याशी दोन हात करताना दिसत आहे. त्यात राजेश्वरी या ८ महिन्यांच्या गर्भवती असूनही घरात आराम न करता गावोगावी जाऊन सर्वे करत आहेत. गरोदरपणाच्या नाजूक परिस्थितीमध्ये धोका अधिक असतो. मात्र, राजेश्वरी या गरोदरपणातही सतत कार्यरत आहेत.

दोन जीवांची असूनही 'ती' कोरोनाशी करतेय दोन हात
दोन जीवांची असूनही 'ती' कोरोनाशी करतेय दोन हात

By

Published : Apr 17, 2020, 11:30 AM IST

मारवाड जंक्शन - कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात पसरला आहे. अशात डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस हे खंबीरपणे या आजाराशी युद्ध लढत आहेत. राजस्थानच्या मारवाड येथील एएनएम असलेल्या राजेश्वरी चौधरी या गरोदर असतानाही स्वत:ची काळजी न करता गावोगावी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.

दोन जीवांची असूनही 'ती' कोरोनाशी करतेय दोन हात

बाडमेरच्या गरल गावातील रहिवासी राजेश्वरी चौधरी या पालीच्या देसूरी पहाड भागातील कोट सोलंकियानयेथील सब सेंटरवर सन २००९ पासूर एएनएम म्हणून कार्यरत आहेत. सध्या कोरोनाचे महासंकट ओढावले असताना आरोग्य विभागातील प्रत्येकजण त्याच्याशी दोन हात करताना दिसत आहे. त्यात राजेश्वरी या ८ महिन्यांच्या गर्भवती असूनही घरात आराम न करता पोटात बाळ घेऊन गावोगावी फिरुन सर्वे करत आहेत. गरोदरपणाच्या नाजूक परिस्थितीमध्ये धोका अधिक असतो. मात्र, राजेश्वरी या गरोदरपणातही सतत कार्यरत आहेत.

त्या रोज गावातील घरा-घरात जाऊन सर्वे करतात. या सर्वेदरम्यान आत्तापर्यंत त्यांनी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून आलेल्या १७७ प्रवासी कामगार, मजुरांना होम आयसोलेट केलं आहे. गावातील सरपंच राजू सोनी यांनी राजेश्वरी यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. ८-९ महिन्याची गर्भवती असतानाही स्वत:ची, पोटातील बाळाची काळजी न करता राजेश्वरी सतत गावासह आसपासच्या परिसरात जाऊन सर्वे करत आहे. त्यांचे हे कार्य आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सरपंच सोनी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details