नवी दिल्ली -देशभरामध्ये मागील 24 तासांत 1 हजार 684 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. आत्तापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा 23 हजार 77 झाला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर 20.57 टक्के झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.
मागील 24 तासांत देशभरात 1 हजार 684 नवे रुग्ण; रुग्ण बरे होण्याचा दर 20. 57 टक्के - corona news
मागील 28 दिवसांत 15 जिल्ह्यात एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. तर 80 जिल्ह्यामध्ये मागील 14 दिवसांत एकही नवी केस समोर आली नाही, अशी माहिती अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Breaking News
मागील 28 दिवसांत 15 जिल्ह्यात एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. तर 80 जिल्ह्यामध्ये मागील 14 दिवसांत एकही नवी केस समोर आली नाही, अशी माहिती अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना निगराणीखाली ठेवणे, यास आमची प्राथमिकता आहे. त्यानुसार 9 लाख 45 हजार नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांनी सांगितले.