बिकानेर - संपूर्ण जगात क्षयमुक्तीसाठी २०३० पर्यंतचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र, आपला देश २०२५ पर्यंतच क्षयमुक्त व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री व संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राजस्थानमधील बिकानेर येथे दिली. ते येथील सरदार पटेल वैद्यकीय महाविद्यालयमध्ये क्षयमुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
२०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त होणार - केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल - सरदार पटेल मेडिकल कॉलेज
पूर्ण जगात क्षयमुक्तीसाठी २०३० पर्यंतचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र, आपला देश २०२५ पर्यंतच क्षयमुक्त व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री व संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राजस्थानमधील बिकानेर येथे दिली.
![२०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त होणार - केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3967562-thumbnail-3x2-bikaner.jpg)
ते पुढे म्हणाले की, क्षयमुक्तीसाठी आणि त्यावरील उपचारासाठी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. तसेच मेडिकल प्रोफेशनल्स चिकित्सक क्षयमुक्तीसाठी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. क्षयमुक्तीसाठी कोणत्याही प्रकारचे चुकीचे उपचार न करता वैद्यकीय चाचणीद्वारे हा आजार बरा होऊ शकतो.
कार्यशाळेत यावेळी मेघवाल यांना देश आणि जगामध्ये क्षयमुक्तीसाठी केले जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली गेली. यावेळी सरदार पटेल वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य एच. एस. कुमार यांच्यासोबत अन्य मान्यवर उपस्थित होते.