नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 800पेक्षा अधिक झाली आहे. कोरोना विषाणूवर उपचार शोधण्यासाठी चीन, अमेरिकेमधील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. कोरोना विषाणूचे सूक्ष्म छायाचित्र मिळवण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी मायक्रोस्कोपद्वारे (सूक्ष्मदर्शकयंत्र) एसएआरएस-सीओव्ही -2 (COVID19) विषाणूचे छायाचित्र घेतले आहे. इंडियन जरनल ऑफ मायक्रोबायोलॉजी रिसर्चच्या (IJMR) अंकात ही माहिती देण्यात आली आहे.