नवी दिल्ली -देशभरामध्ये मंगळवारी दसरा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंजाबमधील अमृतसर येथील नागरिकांनी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे सेना प्रमुख बाजवा यांचे छायाचित्र प्रतिकात्मक पुतळ्यावर लावून त्याचे दहन केले आहे.
दहशतवादाबद्दल आणि पाकिस्तानकडून होत असलेल्या नियत्रंण रेषेवरील कुरापतीमुळे नागरिकांमध्ये इम्रान खान यांच्याबद्दल राग आहे. पाकिस्तानप्रती असलेली नाराजी व्यक्त करत नागरिकांनी इम्रान खान आणि बाजवा यांच्या छायाचित्राला काळे फासून प्रतिकात्माक पुतळ्याचे दहन केले आहे. रावण असो अथवा दहशतवाद असो मात्र नेहमी असत्यावर सत्याचा विजय होतो, असा संदेश नागरिकांनी दिला आहे.