नवी दिल्ली / इस्लामाबाद - पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपवण्याचा आणि द्विपक्षीय व्यापार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आर्टिकल ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर पुनर्रचनेचे विधेयक संसदेत मंजूर केले. यामुळे इतर राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरही कोणत्याही अटींशिवाय भारताला जोडण्यात आले. हा निर्णय पाकला चांगलाच झोंबला असून भारताशी असलेले सर्व पातळ्यांवरील संबंध तोडण्याचा निर्णय पाक संसदेत घेण्यात आला आहे.
पाकिस्तानचा भारताशी सर्व पातळ्यांवरील संबंध तोडण्याचा निर्णय - jammu kashmir reorganization bill
भारत सरकारने जम्मू-काश्मीरविषयी उचललेल्या पावलामुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या या निर्णयामुळे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला होता. इम्रान खान यांच्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयांची ट्विटद्वारे माहिती देण्यात आली.

'भारताशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय, भारताशी द्विपक्षीय व्यापाराला स्थगिती, द्विपक्षीय करारांवर पुनर्विचार, हा विषय संयुक्त राष्ट्रे आणि सुरक्षा परिषदेकडे नेणे, १४ ऑगस्ट हा दिवस शूर काश्मिरींसोबत ऐक्य दिन म्हणून पाळणे,' असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.