इस्लामाबाद - जम्मू काश्मीरचे विभाजन आणि ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान पुरता बिथरला आहे. चीननंतर आता पाकिस्तान अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनवणी करीत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये आज काश्मीर मुद्यावर चर्चा झाली. यासंबधी इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण केल्याची माहिती आहे.
इम्रान खान यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे संदर्भात विश्वासात घेतले आहे. इम्रान खान अनेक देशांच्या संपर्कात असून काश्मीर प्रश्नावर जागतिक पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पाकिस्तानचे परारष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.