दिल्ली चलो आंदोलनाला महिना पूर्ण; शेतकरी आज पाळणार निषेध दिन..
दिल्ली चलो आंदोलनाला महिना पूर्ण; शेतकरी आज पाळणार निषेध दिन.. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या आंदोलनाचा आज ३१वा दिवस आहे. गेल्या महिनाभरापासून हे शेतकरी केंद्राने कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी सीमांवर ठाण मांडून आहेत. या आंदोलनासाठी आज देशातील २०० जिल्ह्यांमधील ५ हजार ठिकाणी निषेध दिन पाळण्यात येणार आहे.
सरकारशी चर्चा होणार का? शेतकरी संघटना आज घेणार बैठक..
सरकारशी चर्चा होणार का? शेतकरी संघटना आज घेणार बैठक.. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामधील आतापर्यंतच्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी सरकारने पुन्हा चर्चेसाठी शेतकऱ्यांसमोर प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाचे काय करायचे याबाबत निर्णय घेण्यासाठी आज कृषी संघटनांची बैठक पार पडणार आहे.
हनुमान बेनिवाल दिल्लीकडे करणार कूच..
हनुमान बेनिवाल दिल्लीकडे करणार कूच.. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरएलपीचे संस्थापक सदस्य आणि खासदार हनुमान बेनिवाल आज दिल्लीला रवाना होणार आहेत. ते शेकडो शेतकऱ्यांसह दिल्लीच्या सीमांवर आंदोलनासाठी जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज ते दिल्लीच्या सीमेवर असताना एनडीएला दिलेला पाठिंबा काढण्याचीही घोषणा करु शकतात.
आज बॉक्सिंग डे..
नाताळचा दुसरा दिवस हा 'बॉक्सिंग डे' म्हणून साजरा करण्यात येतो. नाताळच्या दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांना ख्रिसमस बॉक्स देण्याच्या प्रथेमुळे या दिवसाची सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये आणि बहुतांश पाश्चिमात्य देशामध्ये यादिवशी सुट्टी जाहीर करतात. जर बॉक्सिंग डे शनिवारी आला, तर ही सुट्टी सोमवारी दिली जाते, आणि जर बॉक्सिंग डे रविवारी आला तर ही सुट्टी मंगळवारी दिली जाते.
राष्ट्रीय उद्यानात आज नव्या वाघाचे आगमन..
राष्ट्रीय उद्यानात आज नव्या वाघाचे आगमन.. बोरिवलीमध्ये असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज एका नव्या वाघाचे आगमन होणार आहे. नागपूरहून काल सायंकाळच्या सुमारास या वाघाला घेऊन खास पथक रवाना झाले असून, आज सकाळी लवकर तो उद्यानात दाखल होईल. उद्यानात गेल्याच महिन्यात एका महिन्याची वाघिण दाखल झाली होती, त्यानंतर आता हा वाघ येणार आहे.
गृहमंत्री अमित शाह आजपासून आसाम दौऱ्यावर..
गृहमंत्री अमित शाह आजपासून आसाम दौऱ्यावर.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱयावर आहेत. ते आज पहाटेच गुवाहाटीमध्ये दाखल झाले. या दौऱ्यामध्ये ते विविध विकासकामांचे उद्घाटन करतील.
आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना..
आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना.. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू होतो आहे. या पार्श्वभूमीवर संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. चार सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना आहे. या सामन्यासाठी कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात दारुण पराभूत झालेला भारताचा संघ आता सूड घेण्याच्या तयारीने मैदानात उतरेल.
आफ्रिका-श्रीलंका; पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटी आजपासून..
आफ्रिका-श्रीलंका; पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटी आजपासून.. आजपासून दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका तसेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांदरम्यानच्या कसोटी सामन्यांनाही सुरूवात होणार आहे. प्रत्येकी दोन-दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हे पहिले सामने असणार आहेत.
बाबा आमटेंची आज जयंती..
डॉ. मुरलीधर देवीदास आमटे, म्हणजेच बाबा आमटे यांची आज जयंती आहे. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा जगभरात प्रसिद्ध झाले होते. यासोबतच वन्य जीव संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा काही चळवळींमध्येही बाबांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले होते. बाबा आमटेंना पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, गांधी शांती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
प्रकाश बाबा आमटे यांचा जन्मदिन..
प्रकाश बाबा आमटे यांचा जन्मदिन.. बाबा आमटेंचे द्वितीय पुत्र प्रकाश बाबा आमटे यांचा आज जन्मदिन. बाबा आमटेंनी सुरू केलेल्या समाजकार्याला पुढे नेण्याचे काम प्रकाश बाबा आमटे करत आहेत. त्यांना पद्मश्री, मॅगसेसे, मदर तेरेसा पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.