महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर - AMIT SHAH IN SINDHUDURG

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

या घडामोडींवर असणार आज खास नजर
या घडामोडींवर असणार आज खास नजर

By

Published : Feb 7, 2021, 6:39 AM IST

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सिंधुदुर्गमध्ये
    अमित शाह

गृहमंत्री अमित शाह हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत.

  • राष्ट्रपती कोविंद आज कर्नाटक आंध्रप्रदेश दौऱ्यावर
    राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बंगळुरू येथे २३ व्या पदवीदान समारंभात उपस्थित राहतील. त्यानंतर कोविंद हे आंध्रप्रेदशातील मदनपल्ले येथे सत्संग फाउंडेशनच्या आश्रमास भेट देणार आहेत,

  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज आसाममध्ये रस्ते विकास कामांचा शुभारंभ
    पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये २ रुग्णालयांच्या कोनशिलेचे उद्घाटन करतील. तसेच आसाम राज्यातील राष्ट्रीय आणि जिल्हा मार्गाच्या 'आसोम माला' या प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभ करतील.

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची आज मुंबईत पत्रकार परिषद
    निर्मला सीतारामण

केंद्राचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आहे. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची मुंबईत पत्रकाप परिषद होणार आहे.

  • विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तब्बल १०० उपग्रहांचे आज प्रक्षेपण
    उपग्रह प्रक्षेपण

विद्यार्थ्यांनी तयार केलेले तब्बल १०० उपग्रहांचे आज प्रक्षेपण करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे जन्मगाव रामेश्वरम येथून हे उपग्रह सोडले जाणार आहेत,

  • मंत्री विजय वडेट्टीवार बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर
    विजय वडेट्टीवार

राष्ट्रीय ओबीसी महासंघ बुलडाणा जिल्हा आयोजित विदर्भस्तरीय ओबीसी महाअधिवेशनास उपस्थिती. तसेच श्री गजानन महाराज मंदिर शेगांव येथे दर्शन घेतील. व सायंकाळी 5 वाजता शेगांव येथून नागपूरकडे प्रयाण करतील

  • भारत इंग्लड कसोटीचा आज तिसरा दिवस
    कसोटी क्रिकेट

चेन्नईमध्ये सुरू असलेल्या भारत इंग्लडमधील कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवस अखेर इंग्लडने 8 खेळाडू गमावत 555 धावांचा डोंगर रचला आहे,

ABOUT THE AUTHOR

...view details