महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर - अमित शाह

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर
NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर

By

Published : Feb 6, 2021, 6:23 AM IST

  • संयुक्त किसान मोर्चाचा दिल्ली वगळून देशभर चक्काजाम आंदोलन
    शेतकरी आंदोलन

गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत शांततेत आंदोलन केल्यानंतर आता आंदोलक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. उद्या 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्ली सोडून संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार आहेत.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सिंधुदुर्गमध्ये
    अमित शाह आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

गृहमंत्री अमित शाह हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज गुवाहटीमध्ये
    निर्मला सीतारामण

अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज गुवाहटी दौऱ्यावर आहेत. त्या चैह बागीचा धन पुरस्कार मेळाव्याला उपस्थिती लावतील

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यात संग्रहालयाचे उद्घाटन करणार
    राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कर्नाटकातील मदिकेरीमध्ये जनरल थिमैया स्मारक संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

  • गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरकमहोत्सवानिमित्त पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण
पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात उच्च न्यायलायास ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण करतील. सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम पार पडेल

  • स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर भाविकांसाठी होणार खुले
    स्वामीनारायण

गुजरातमधील गांधीधामचे अक्षरधाम मंदिर आज नागरिकांना दर्शनसाठी उघडले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.

  • तेलंगणामध्ये आजपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
    तेलंगणामध्ये लसीकरण

कोरोनाच्या काळात काम करणारे आरोग्य कर्मचारी पोलीस यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. तेलंगणामध्ये आजपासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. ६ ते १२ फेब्रुवारी हा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे

  • आज पासून राष्ट्रपती भवन पर्यटकांसाठी होणार खुले
    राष्ट्रपती भवन

सरकारने राष्ट्रपती भवन आजपासून पुन्हा एकदा नागरिंकासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना महामारीमुळे 13 मार्च 2020 ला राष्ट्रपती भवन बंद करण्यात आले होते.

  • आज भारत इंग्लंड कसोटी मालिकेचा दुसरा दिवस
    कसोटी दुसरा दिवस

चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लडने 3 विकेट गमावत 263 धावा केल्या आहेत. कॅप्टन जो रूट याने नाबाद 128 धावा काढल्या आहेत. तर सिबली याने शानदार 87 धावांची खेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details