महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

या घडामोडींवर असणार आज खास नजर
या घडामोडींवर असणार आज खास नजर

By

Published : Feb 4, 2021, 6:18 AM IST

  • आज जागतिक कर्करोग दिन-

कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. हा दिवस प्रतिवर्षी ४ फेब्रुवारीला साजरा केला जातो.

कर्करोग दिन विशेष
  • ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी मुख्यालयात जनता दरबार

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित राहून आज अजित पवार जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते तत्काळ मार्गी लावणार आहेत. अजित पवार हे सकाळी ८ ते १२ आणि सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे हे हे दुपारी २ ते ३ या वेळेत प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहतील.

अजित पवारांचा जनता दरबार
  • गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची आज बांधकाम व्यावसायिकांसोबत बैठक
    जितेंद्र आव्हाड
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई महापालिका अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला. या अर्थसंकल्पावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मत व्यक्त करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत मनसे अर्थसंकल्पाबाबत आपली कोणती भूमिका मांडते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

मनसे पत्रकार परिषद्
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कर्नाटक दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत, उद्या ते बंगळुरूला सुरू असलेल्या एअरोशो २०२१ च्या एका कार्यक्रमात ते संबोधन करतील.

राष्ट्रपती कोविंद
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चौरी-चौरा घटनेच्या शताब्‍दी समारंभाचे उद्घाटन करतील.

उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर दजल्यातल्या चौरी चौरा येथे1922 मध्ये घडलेल्या घटनेच्या शताब्दी समारोहाचेा उद्घाटन पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. यावेळी या घटनेशी संबंधीत टपाल टिकाटाचे प्रकाशन ही मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. 4 फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीत 22 पोलीस जळून मरण पावले होत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • भारत आज हिंदी महासागराच्या किनारपट्टी देशांच्या सुरक्षा मंत्र्यांचे संमेलन आयोजित करणार

भारत, एअरो इंडिया-2021 च्या मुख्‍य कार्यक्रमा व्यतिरिक्त आज हिंद महासागराच्या तटीय देशांच्या सुरक्षा मंत्र्यांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचा मुख्य विषय हिंदी महासागरामध्ये शांती, सुरक्षा आणि सहकार्य यामध्ये वाढ हा आहे.

राजनाथ सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details