- 1) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; आज पंतप्रधान घेणार सर्वपक्षीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अजेंडा समोर ठेवणार असल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
- 2) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 66 वा दिवस
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 66 वा दिवस आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची प्रमुख मागणी या शेतकऱयांची आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी 26 जानेवारीला शेतकऱयांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. याला हिंसक वळण लागले होते.
- 3) शेतकरी आंदोलकांकडून आज सदभावना दिवस
तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱयांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलकांकडून आज उपवास करत सदभावना दिवस साजरा केला जाणार आहे. मागील 66 दिवसांपासून हे शेतकरी आंदोलक आंदोलन करत आहेत.
- 4) येस बँक प्रकरण : राणा कपूरची आज संपते ईडी कोठडी
येस बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांना आजपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. येस बँकेच्या कर्ज वाटपासंबंधी आणखीन एक गुन्हा राणा कपूर यांच्याविरोधात ईडीकडून दाखल करण्यात आल्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा राणा कपूर यांची चौकशी करण्यात येणार आहे.
- 5) आज होणार एल्गार परिषद
31 डिसेंबरच्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारल्यानंतर आता आज, 30 जानेवारीला एल्गार परिषद घेण्यास परवानगी मिळाली आहे, आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषद होणार आहे.
- 6) मुंबईत आजपासून प्रत्यक्षात हेरिटेज वॉक सुरू